शरीराच्या या भागात घुसली सुई , पिरंगुट मधील धक्कादायक घटना

पुणे : आपण बरेच जण घरीच शिवणकाम करतो. त्यासाठी सुई दोऱ्याचा वापर करतो. पण शिवणकाम झाल्यानंतर सुई जर व्यवस्थित ठेवली नाही अथवा ती जर तशीच कोठेही पडली तर नक्कीच अनावधानाने ती सुई शरीरात घुसू शकते व त्यामुळे ती घातक ठरू शकते.pune local news
अशाच प्रकारची एक घटना पिरंगुट ता.मुळशी भागात घडली. घरात शिवणकाम झाल्यानंतर वापरलेली सुई तशीच गादीवर पडून राहीली व नंतर त्या गादीवर बसलेल्या व्यक्तीच्या पार्श्वभागात ती सुई घुसली व खोल जावून बसली. संबंधित व्यक्तीला काहीतरी टोचले असे जाणवले. वेदना होऊ लागल्याने एक्स रे काढल्यानंतर सुई आता घुसल्याचे लक्षात आले.

सुई आत घुसल्यामुळे ती मांडीतल्या नसा अथवा रक्तवाहीण्यांना इजा करणारी ठरू शकते. म्हणून ऑपरेशन करून सुई काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी पार्श्वभागात घुसलेली सुई शोधणे हे खुप जिकरीचे काम असते.पार्श्वभागात असलेले मोठे स्नायू व लहान पण टोकदार सुई. ऑपरेशन दरम्यान सुद्धा शरीरातील नसेला अथवा रक्तवाहीनीला सुई इजा करू शकते. ही सुई काढण्याची शस्त्रक्रिया काल पिरंगुट मधील श्रद्धा हाॅस्पीटल मध्ये करण्यात आली.
सुई घुसली आहे ह्याबाबतचे निदान पिरंगुट मधील गणेश हाॅस्पीटल चे डाॅ.गणेश साळुंखे ह्यांनी केले. शस्त्रक्रिया अस्थीरोग तज्ञ डाॅ.सचिन नागापूरकर यांनी केली व भूलतज्ज्ञ म्हणून डाॅ.दोभाडा मॅडम ह्यांची मदत केली तर डाॅ.सचिन न्याहारकर ह्यांनी फिजीशियन म्हणून काम केले. शिवणकाम करताना अथवा शिवणकाम झाल्यानंतर सुई व्यवस्थित जागी ठेवणे व ती ठेवली गेली आहे का हे बघणे आवश्यक आहे.असे गणेश हाॅस्पीटल चे डाॅ.गणेश साळुंखे ह्यांनी सांगितले…









