ओमिक्राॅनची लाट, सर्वजण मिळून थोपवू : डाॅ.बाळकृष्ण गायकवाड

पुणे : आज गेले साधारणपणे पाऊणे दोन वर्ष झाली आपण सर्वजण कोरोना संसंर्ग आजारावर विजय संपादन करण्यासाठी लढत आहोत. भारतासारखे विकसनशील देशात तर ह्या आजारामुळे खूप आर्थिक, मानसिक, आरोग्य विषयक नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना व जनजीवन सुरळीत होत असताना आता परत ओमिक्राॅन नावाच्या कोरोनाच्या नवीन प्रजातीने डोके वर काढले आहे. या कोरोनाच्या नव्या प्रजातीला रोखायचे असेल तर न घाबरता, काळजी घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांनी मिळून हे केले तर आपण ओमिक्राॅनची लाट नक्कीच रोखू शकतो.
आज आपण भारतीय लस उपलब्ध करण्यात बरेच आघाडीवर आहोत शासकीय आकडेवारीनुसार साधारणपणे आजमितीस 125 कोटी डोस पुर्ण झाले आहेत. परंतू आजही लस न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. आपल्याला आजही त्यांचे आरोग्य विषयक मत जागृत करावयाचे आहे.
ओमिक्राॅन नावाच्या कोरोनाच्या नवीन प्रजातीने डोके वर काढले असेल तरी आपल्याला ह्या आजारावर लवकर मात करावयाची आहे. आता आपल्या कोणालाच लाॅकडाऊन नको आहे . लॉक डाऊन टाळायचा असेल तर खबरदारी हा एकमेव उपाय आहे.

आपण विकसित नाहीत पण तरीही आपण महाराष्ट्रातील व राज्यातील जनतेने येणारे काही दिवस थोडी काळजी घेतली तर आपण ही नवीन कोरोना संसंर्ग साथ थांबवू शकतो. येणारे काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम, आनंद सोहळे, जत्रा, यात्रा, आपण टाळणे आवश्यक आहे. गाण्याचे कार्यक्रम, गर्दी होणारे सोहळे टाळले पाहीजेत. गर्दी टाळणे, एकत्र न येणे हेच हा नवीन आजार टाळण्यासाठी महत्वाचे आहे. अजून किमान दोन तीन महिने हे टाळले तर कोरोना हद्दपार करण्यास आपण यशस्वी होऊ शकतो. आपण सर्वजण मिळून ह्या कोरोनाला हरवूयात, त्याला थोपवूयात, येणारी लाट थांबवूयात. काही दिवस थोडा त्रास होईल पण नंतरचा काळ आपलाच आहे.
डाॅ.बाळकृष्ण गायकवाड
तिरुपती हाॅस्पीटल बावधन



