पुणे शहर

कोथरूडमध्ये पौड रस्त्यावर बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात ; दोन दुचाकींना उडवले.. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

कोथरूड : Pune Kothrud पौड रस्त्यावर वनाज कंपनी जवळ एसटी महामंडळाच्या एशियाड बसचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या अपघातात दोन दुचाकींच नुकसान झालं असून बस मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस मेट्रोच्या पिलरवर धडकवून बस जाग्यावर थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. Big accident on Kothrud Poud road due to bus brake failure; .. Big accident was avoided as the driver showed caution

गुरुवारी रात्री साधारण साडेआठ नऊच्या सुमारास हा अपघात घडला. बस क्रमांक एम एच १४ बी टी ४९९८ ही फलटण आगाराची बस मुंबई परळकडून फलटण कडे निघाली होती. चांदणी चौकातून खाली उतरून कोथरूड डेपो पासून पुढे आल्यानंतर वनाज कंपनी जवळ बसचा ब्रेक फेल झाला. चालक निलेश शिंदे यांनी प्रसंगावधान राखत बस मेट्रो पिलरला धडकावली त्यामुळे रस्त्यावर होणारा मोठा आपघात टळाला पण हे करत असताना ॲक्टिव्हा व स्प्लेंडर या दोन दुचाकींना बस धडकल्याने त्यांचे नुकसान झाले व बस मधील तीन ते चार प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक बसवराज माळी यांनी सांगितले.

चालकाने बस मेट्रो पिलरला धडकवली नसती तर रहदारीच्या पौड रस्त्यावर मोठा अपघात अपघात होऊन अनर्थ घडला असता. पण चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात घडल्यानंतर चालक भेदरलेला होता, लोक मरतील की काय असं त्याला वाटत होत पण ज्यांच्या ॲक्टिवा गाडीचे नुकसान झाले ते जीवन कुंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व स्थानिकांनी त्याला आधार दिला व किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना खासगी रुग्णालयात नेले. अपघात घडल्यानंतर स्वारगेट डेपो व मेट्रो चे अधिकारी, पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेत कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

सुदैवानं चांदणी चौक किंवा भुसारी कॉलनी कडे येणाऱ्या उतारावर हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. किनारा हॉटेल चौक, वनाज कंपनी जवळ संध्याकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असती. रहदारीचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेत हा अपघात घडला. चालकाने समयसूचकता दाखवत बस मेट्रोच्या पिलर नेऊन धडकून थांबल्याने मोठी जीवित व वित्त हानी टळल्याची चर्चा कोथरूड मध्ये आहे.

Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये