कर्वेनगर मधील गुन्हेगारी व गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व ग्रामस्थांमध्ये बैठक संपन्न

पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली केलेल्या कारवाईची माहिती
ग्रामस्थांकडून ही विविध मुद्दे उपस्थित
कर्वेनगर : मागील काही दिवसांपूर्वी कर्वेनगर मध्ये कोयता गँगने दहशत पसरवून दोन्ही युवकांना गंभीर जखमी केले होते, तसेच या परिसरातील अवैध दारू विक्री या संदर्भात ग्रामस्थ आणि रहिवासी यांनी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कठोर कारवाई बाबत मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत कर्वेनगर मधील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब, ए.पी.आय पाटील आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक जैतापूरकर यांनी सांगितले की, या घटनेनंतर पोलिसांनी या परिसरामध्ये अवैध दारू विक्रीचे धंदे बंद केले असून, रात्री 11 नंतर टपऱ्या व हातगाड्या बंद करण्यात येत आहेत. तसेच कर्वेनगर मधील घटनेतील आरोपींना सर्वात कठोर कायदा मोका लावण्यात आलेला आहे. रोज रात्री पोलिसांची गस्तीची गाडी फिरत असते, त्याचप्रमाणे कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे आम्ही या परिसरात गुन्हेगार पकडले असून शस्त्र साठा जप्त केला आहे.
विशेषत: कर्वेनगर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्टेल्स असल्यामुळे विद्यार्थी हलगर्जीपणा करीत आहेत, त्यामुळे त्यांचे लॅपटॉप व मोबाईल चोरी होत आहेत, मागील महिनाभरामध्ये गुन्हे होण्याचं प्रमाण कर्वेनगर परिसरामध्ये खूपच कमी झाले आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.
कर्वेनगर च्या सुरक्षतेबाबत आम्ही ग्रामस्थ व रहिवासी पोलिसांना संपूर्णपणे सहकार्य करू असे चंद्रकांत बराटे यांनी सांगितले.

कर्वेनगर आणि परिसरातील हॉस्टेल चालकांची मीटिंग घेऊन नियमावली करून कर्वेनगर मध्ये शांतता, सुरक्षितता राहण्याबाबत, गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना बाळासाहेब बराटे यांनी केली. कर्वेनगर मधील अनेक मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते सुरू करावेत अशी विनंती कुमार बराटे यांनी केली. आता सध्या दहीहंडी गणेशोत्सव सण सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली पाहिजे अशी सूचना नंदू घाटे व जगदीश दिघे यांनी याप्रसंगी केली.
याप्रसंगी पोपट फेंगसे, माणिक दुधाने , संभाजीराव बराटे , लक्ष्मणराव बराटे, आनंद तांबे, नंदू घाटे, पोपट बराटे, हरिभाऊ बराटे जगदीश दिघे, संतोष बराटे, संजय बराटे ,दिलीप बराटे, दिनेश बराटे, सुनील तोडकर सुनील कडू दशरथ फेंगसे तसेच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक नागरिक उपस्थित होते.









