राजकीय
VIDEO : अखेर वसंत मोरेही महाआरतीत दिसले, गर्दीतला तो 15 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यात महाआरती पार पडली आहे. मनसेचे नगरसेवकवसंत मोरेही या महाआरतीत दिसले, त्यांचा गर्दीतला तो 15 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राज ठाकरे आज पुण्यातील खालकर मंदिरात पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हे भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. राज यांच्या या भूमिकेवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांनी जोरदार टीका केली. या टीकेनंतर आक्रमक झालेल्या राज यांनी आपल्या राजकीय विरोधकांना आव्हान देत स्वत:च मैदानात उतरण्याची भूमिका घेतली.







