महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची नावे राज्यपालांकडे सुपूर्द

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. एकनाथ खडसे, सचिन सावंत, रजनी पाटील या उमेदवारांची नावं यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Img 20201024 wa0166 1

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांची नावे राज्यपालांकडे देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती आज अखेर ही नावे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये