सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दुधाने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

कर्वेनगर : वारजे कर्वेनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते, लोकसेवक प्रवीण दुधाने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ३३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यास एक लाखाचा विमा देऊन दुधाने यांचेकडून त्यांना अनोख्या पद्धतीने सन्मानित करण्यात आले. Social activist Praveen Dudhane’s birthday celebrated with various social activities …
प्रवीण दुधाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वारजे कर्वेनगर भागात १५ हजार कुटुंबात कापुर तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान म्हणत रक्तदान करून एका व्यक्तीचा जीव वाचवूया या उद्देशानं आयोजित रक्तदान शिबिरात ३३९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिला रक्तदात्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. तसेच कोरोनाच्या महामारीत अनेकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे २५० पेक्षाही अधिक दिव्यांग व्यक्तींना, विधवा महिलांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. याचबरोबर पुणे शहरातील ३२० रिक्षा चालकांना पार्टिशन किट व अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

या वेळी आरएसएस चे चित्तरंजन भागवत, आमदार भीमराव तापकीर, कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी आमदार उल्हास पवार, शरदआबा बराटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, बाळासाहेब बराटे, नगरसेवक सुशील मेंगडे, विठ्ठल बराटे, भारतभुषण बराटे, नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी, नगरसेविका सायली वांजळे, पुजा गाडे, सुभाषभाऊ नाणेकर, आशिष कांटे, किरण बारटक्के, वासुदेव भोसले, हर्षवर्धन मानकर, ॲड. राहुल पाटील, श्रीकृष्ण बराटे, संजय दोडके, सचिन दांगट, दत्ता झंजे, सचिन बराटे, आलम पठान, अमोल बराटे, दत्तात्रय भिलारे, गोरख भालेकर, पोपट फेंगसे, विभीषण मुंडे, पोपट बराटे, चेतन भालेकर, जीवन मानकर, विश्वास मानकर, अविनाश बलकवडे, निलेश माझिरे तसेच राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रवीण दुधाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रामचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी केले.



