शैक्षणिक

विद्यार्थ्यांना दिलासा : कोरोना कालावधीत 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार

मुंबई : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवरील (Students)कोरोना कालावधीत (Corona) 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना पासपोर्ट (Passport), उच्च शिक्षण (Education) घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून (Home Minister) हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, कोरोना कालावधीत ज्या मुलांवर आणि नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गृहविभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे की, असे गुन्हे आम्ही मागे घेत आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत, असे वळसे-पाटील म्हणाले. 

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये