पुणे शहर

पर्वतीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन

पुणे : महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारा विरोधात, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाच्या वतीने आमदार माधुरी मिसाळ यांच्या आणि बाबाशेठ मिसाळ यांच्या  मार्गदर्शनाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी पर्वती मतदारसंघातर्फे मार्केट यार्ड चौक, पुणे सातारा रोड येथे घोषणा देऊन राज्य  सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निषेध करण्यात आला.
    “राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना, मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. त्यातच राज्यात अनेक ठिकाणी घडलेल्या बलात्कार, विनयभंगासारख्या गुन्ह्यांमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अगदी करोनाचे रुग्ण असलेल्या कोविड सेंटरमध्येही अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत. बाकी राज्यात घडणाऱ्या घटनांचा निषेध करणारे सरकार स्वत:च्या राज्यात मात्र महिलांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री ह्या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टींचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे तीनचाकी आघाडी सरकारचा निषेध” अशा भावना आमदार मिसाळ यांनी व्यक्त केल्या.
    या आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर यांनी केले. यावेळी पुणे शहराच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष प्रसन्न जगताप,शहर उपाध्यक्ष दिनेश धाडवे,अनु. जाती  मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे,नगरसेविका राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, रुपाली धाडवे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, रघुनाथ गौडा, महेश वाबळे तसेच विश्वास ननावरे, नितीन बेलदरे, महिला मोर्चाच्या अनिता दीक्षित, आशा बिबवे,प्रभावती मटाले, विनया बहुलीकर, संध्या नांदे,नीता थोरवे,सारिका ठाकर हरीश परदेशी,संजय गावडे, दीपक शिरवळकर,राजू कदम, अमोल यादव, राजेंद्र सरदेशपांडे,किरण वैष्णव,गणेश शेराला यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अशी माहिती शैलेश देशपांडे यांनी दिली.

7 7

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये