पुणे शहर

वारजेत वन उद्यानातील खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू

वारजे : गणपती माथा येथील वन विभागाच्या टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत दक्ष सुशांत कांबळे (वय वर्षे १३, रा. रामनगर वैदुवाडी परीसर वारजे) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 15 आॅगस्ट रोजी गणपती माथा येथील नागरी वन उद्यानातील खाणीतील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठले होते.  साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुले पोहायला गेली होती. पोहताना दक्ष कांबळे हा पाण्यात बुडाला. या प्रकारानंतर दक्ष सोबत पोहायला गेलेली बाकीची  तिन मुले घाबरल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहीती घरी दिली नाही.

Fb img 16474137314571819310932637888379

सायंकाळ झाली तरी दक्ष घरी न आल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली त्यांनी सर्वत्र शोध सुरू केला. शेवटी मित्रांकडे चौकशी केली असता तो दुपारी खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहीती त्यांनी दिली. घटनेची माहीती वारजे माळवाडी पोलीसांना मिळताच वारजे पोलीस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शोध कार्य सुरू केले.

जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केल्यानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह सापडत नव्हता. त्यानंतर पोलीसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वा बाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये