महाराष्ट्रराजकीय

पुणे, मुंबईसह रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात; देवेंद्र फडणवीसांचे संकेत

पुणे : मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांवर सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील निवडणुकांचा प्रश्न सध्या न्यायालयात आहे. या निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ शकतात असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हा प्रश्न सध्या न्यायालयात असल्याने देवेंद्र फडणीसांनी केलेल्या या वक्तव्यावरुन राज्य शासनाही भूमिकाही काहीशी स्पष्ट होतेय असं म्हटलं जातंय.

गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत.

Img 20230511 wa00027384472977045778543
Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये