विद्यार्थी काँग्रेस कोथरुड मतदार संघाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन..

कोथरुड : कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राज जाधव यांच्या वतीने आझादनगर परीसरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेत्र तपासणी शिबिराबरोबरच आधारकार्ड- स्मार्टकार्ड शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ७०० हुन अधिक नागरीकांनी याचा लाभ घेतला. कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक चंदुशेठ कदम, संदीप मोरे, राष्ट्रसंत डॉ. पूज्य श्री ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज, पुणे शहर व जिल्हा एन.एस.यु.आय अध्यक्ष भुषण रानभरे, प्रफुल्लराज पिसाळ, कोथरुड काँग्रेस अध्यक्ष विजयभाऊ खळदकर, कोथरुड काँग्रेसचे राजेंद्र मगर, किशोर मारणे, संजय मानकर, सागर खळदकर, महेश विचारे, युवराज मदने, हिमांशू इंगोले, अनिकेत मांडके, तेजस गाढवे, प्रसन्न मोरे, राहुल सोनवणे, तेजस राऊत, एहमद शेख, सोहेल शेख, निहाल शेख, विश्वास खवळे, अक्षय दळवी, यश इंगवले, अशुतोष चव्हाण, आकाश शेट्टी, अभिजीत मोरे, सदाशिव अल्हाट उपस्थित होते.




