पुणे शहर

गणेश जयंती निमित्ताने केळेवाडीतील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

पुणे: गणेश जयंतीच्या निमित्ताने पौड रस्त्यावरील केळेवाडीमधील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती सोहळ्याचे तसेच महिलांच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गणेश जयंती निमित्ताने होम हवन, सत्यनारायण पूजा करण्यात आली. तसेच महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठी उपस्थित महिला भगिनींना वाण म्हणून भेट वस्तू देण्यात आल्या.

यावेळी रुपेश गांडले, सागर तनपुरे, निखिल पळसकर, अमर टाकळे,गणेश शेंडगे,अभिजीत बधे, राहुल गांडले, राहुल पळसकर आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20221228 wa0001281294015812215888080109

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये