पुणे शहर

हाथरस येथील अमानवीय घटनेचा वारजेत निषेध

वारजे : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी  वारजे कर्वेनगर भागातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी (भाजप सोडून) एकत्र येत आंदोलन केले. सामाजिक अंतर ठेवून हे आंदोलन करताना उपस्थितांनी मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे युवक अध्यक्ष सचिन बराटे, वारसा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राची दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष जावेद शेख, तुफेल शेख, दत्ता झंजे, कवाडे गुरूजी, पैगंबर शेख उपस्थित होते.  या प्रसंगी  मनोगत व्यक्त करताना उपस्थितांनी योगी सरकारवर कडाडून टीका केली.

या प्रसंगी कवी राजेंद्र वाघ ह्यांनी कविता सादर करत परिस्थितीच वास्तव मांडलं. या निषेध आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , मनसे, शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. हाथरस येथील घेतनेतील शासकीय दाबावाबाबत योगी सरकार व मोदी सरकारने  राजीनामा द्यावा अशी मागणी जावेद शेख यांनी केली. या संदर्भातील पत्र वारजे पोलिस स्टेशनकडे निवेदन स्वरुपात जमा करण्यात आले.

या आंदोलनाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष जावेद शेख,  वारसा फाऊंडेशन अध्यक्षा प्राची दुधाने, काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे युवक अध्यक्ष  सचिन बराटे यांनी केले होते. 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये