महाराष्ट्र

कोपर्डीत ५ वर्षांच्या चिमुरड्याचा बोअरवेलमध्ये पडल्याने मृत्यू; वाचवण्यासाठी प्रयत्नांची 8 तासांची झुंज व्यर्थ

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पाच वर्षाचा चिमुरडा पडल्याची घटना घडली. काकासाहेब सुद्रिक यांच्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला. या बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला. त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर ८ तासांच्या प्रयत्नानंतर पाच वर्षाच्या सागरला बोअरवेल मधुन काढण्यात यश आलं आहे. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतं.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याचे घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफच्या पाच तुकड्या यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

संध्याकाळी सहाच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. या सर्व परिस्थितीवर तालुका प्रशासनही लक्ष ठेवून होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. बोअरवेलच्या १५ फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणवले. त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम , कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते.

NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोअरवेल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला. त्यामुळे सागरला काढण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये