पुणे शहर
खडकवासला धरणातून दहा हजार क्यूसेक्स पाणी मुठा नदी पात्रात सोडले.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे खडकवासला धरणातून आज सायंकाळी सात वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणाची पाणी पातळी 95 टक्के पेक्षा जास्त झाल्याने आज रात्री आठ वाजता धरणातून 10000 क्युसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.(Ten thousand cusecs of water was released from Khadakwasla dam into Mutha river basin.)
खडकवासला धरणातून आज सायंकाळी ७:०० वा. सोडलेला ५११८ क्यूसेक्स विसर्ग रात्री ८:०० वाजलेपासून १००९६ क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.




























#PuneFloodAlert
#pmc



