महाराष्ट्र

OBC Reservation : इम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल

मुंबई : राज्य मागासवर्ग समर्पित आयोगाने ओबीसी इम्पिरीकल डेटा अहवाल मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना केला आहे. हा अहवाल बंद लिफाफ्यात बांठीया समितीने सादर केला. दरम्यान १२ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून त्यावेळी हा डाटा कोर्टात सादर करण्यात येईल.

ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यात येईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. ओबीसींना राजकीय आरक्षणासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने इम्पेरिकल डेटा (Imperial data) न्यायालयात सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पहिल्याच बैठकीत सांगितले. हा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सोपवण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात त्रिसदस्यीय पिठापुढे १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तातडीने अहवाल तयार करण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यामार्फत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. दरम्यान राज्यातील ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारने तत्काळ मध्यस्थी करून या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर होईपर्यंत पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये