
युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – गिरीश गुरनानी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभा
पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक व पद नियुक्ती कार्यक्रम पार पडला. माजी उपमहापौर दिपक मानकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर ,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे , माजी नगरसेवक शंकर केमसे ,सनी मानकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या अनेक पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमास युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
माध्यमांशी बोलत असताना गुरनानी यांनी दीपक मानकर ,प्रशांत जगताप व किशोर कांबळे यांचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी गुरनानी म्हणले समाजात वावरत असताना समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेणे हाच एका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा निर्धार असायला हवा. त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण नेहमी अग्रेसर असायला हवे या बद्दलचे मार्गदर्शन करायला आपले वरिष्ठ पदाधिकारी आहेतच. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊन समाजातील लोकांची अधिकाधिक मदत कशी करता येईल हे आपण बघितले पाहिजे.पद मिळाल्यानंतर काम थांबत नाही तर तिथून खरे काम सुरू होते.सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आव्हान केले.
मोहित बराटे , विनायक गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व निलेश शिंदे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली




