पुणे शहर

पुण्याची संस्कृती बिघडू दिली जाणार नाही.. पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये यावे – मेधा कुलकर्णी

पुणे : पुणे शहरामध्ये चालू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी शासन, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून फर्ग्युसन कॉलेज येथील बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल पीआय, एपीआय आणि दोन बिट मार्शल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने पोलिसांनी ॲक्शन मोड मध्ये येऊन पुणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीही अवैध अनधिकृत व बार आणि रूप टॉप हॉटेल्स वर त्वरित कार्यवाही कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

कुलकर्णी म्हणाल्या,पुणे शहराची सांस्कृतिक ओळख कुठल्याही पद्धतीने बदलू दिली जाणार नाही,  गैरगोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत.  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्वरित आणि कडक कारवाईचे दिले आहेत. विरोधी पक्षाच्या आरोपांबद्दलच बोलायचे तर यापूर्वीही काँग्रेसच्या एका आमदाराने आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकारी यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, त्याचा त्यांनी काय पाठपुरावा केला ? त्या विषयात त्याचा गप्प का? माझी मागणी आहे की एक्साईज खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बद्दल त्या आरोपांचे काय झाले याची चौकशी झाली पाहिजे.

आता ते गप्प का अशा प्रकारचा प्रश्न  जनता उपस्थित करीत आहे. त्यांनी जे आरोप केले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि एक्साईज अधिकाऱ्यांची चौकशी करून ते जर दोषी असतील तर अशा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाही करावी आणि जर ते दोषी नसतील तर  खोटे आरोप केल्याबद्दल कारवाही करावी अशा प्रकारची आग्रही मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

Img 20240610 wa0014234599511973207107
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240606 wa00116415178194496147748
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240614 wa00146014913648272342267
Img 20240620 wa00182917479592532626119
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00127754739105663743070
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये