पुणे शहर

बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन

पुणे : नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीमुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. बालगंधर्व रंगमंदिर चौकात देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून या चौकशीचा निषेध नोंदविला आहे.

Img 20220610 wa0330

आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार तसेच भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये