पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील भीमनगर येथील सार्वजनिक शौचालय ठेकेदाराच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते राहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. देविदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत.ॲड.सतीश कांबळे व ॲड.अमेय बलकवडे यांनी कोर्टात काम पाहिले
महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी म्हटलं आहे.



