पुणे शहर

भांडण- मारामारी,वादविवाद आणि हसत मुखाने केक बाणेरच्या राजकारणाचे विविध पैलू…..

टीम सिंहासन न्यूज

पुणे : निवडणूका व संघर्ष हा बाणेर च्या राजकीय परंपरेचा भाग आहे. परंतु राजकारणात कधीच कोणी कायमचा शत्रू नसतो हे वाक्य सार्थ ठरवणारी परंपरा बाणेर गावात एका फोटोच्या निमित्ताने चर्चेला आली आहे.

सन 2012 च्या पालिका निवडणुकी दरम्यान अटीतटीचा राजकीय संघर्ष सुरू असताना ताम्हाणे कॉम्प्लेक्स जवळ युवकांना मारहाण झाली. दरम्यान पोलीस तक्रार न्यायालय व राजकीय संघर्ष देखील या प्रक्रियेतून सुरू झाला.

चांदेरे विरुद्ध कळमकर अशी राजकीय स्पर्धा बाणेरच्या राजकारणात सध्या पाहायला मिळत असताना. अचानक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त समीर चांदेरे यांनी भरवलेला केक हा नव्या राजकारणाची नांदी ठरत आहे काय अशी चर्चा सध्या रंगू लागले आहे.

मागील सन २०२० एक वर्षभरापूर्वी बाणेर च्या विकासासाठी नवीन बाणेर पॅटर्न तयार झाला. बिटवाईज चौकामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे व भाजपाच्या दोन नगरसेविका यांनी संयुक्त विकास कार्यक्रमाद्वारे बाणेरच्या विकासाची व राजकीय पटलाची एक वेगळी आखणी सुरू केली. परंतु काही ठराविक कालावधी नंतर ही आखणी योग्य नसल्याची व बाणेर मधील भाजपाला सहकार्य करणार यांची टीका होऊ लागल्याने हा पॅटर्न संपुष्टात आला.परंतु राष्ट्रवादी नको म्हणणाऱ्या नागरिकांचा विश्वास गमावलेल्या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वला पुन्हा विकासाशी व भाजपाशी जोडण्यासाठी आपली विश्वासार्हता लोकांसमोर मांडावी लागत आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

सन 2012 साली सध्या भाजपात असलेल्या कार्यकर्त्यांना लाथानी मारहाण झाली. या घटनेनंतर तब्बल दशकाच्या कालावधीनंतर विरोधी पक्षात असलेल्या याच व्यक्ती एकमेकांना केक भरवतात व शुभेच्छा देतात.बाणेरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वपूर्ण असून विकासासाठी सुरू असलेले समन्वयाचे राजकारण हे बाणेर येथील पंचक्रोशीतील नागरिकांसाठी देखील आदर्शवत आहे.

पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून विकासाचे मुद्दे पुढे घेत गुरूचा आदर्शावर चालण्याचा वसा घेत. वाटून घेण्याची भूमिका ठेवत प्रयत्न केल्यास उद्देश सफल होतो हीच शिकवण बाणेरच्या दशकातील राजकारणाकडे पाहिल्यानंतर मिळते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये