महाराष्ट्रराजकीय

शिवसेना ठाकरे गटात मोठ्या राजकीय हालचाली सुरू, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची उद्या संध्याकाळी चर्चगेट येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींशी संबंधित घडामोडी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी देखील घडत असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचाली वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानीच ही बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.

Img 20230717 wa0012

निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारी करा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीत केली आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कल्याण, अंबरनाथ, कळवा, बोरिवली,दहीसर, मागाठाण्याचे पदाधिकारी हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या.

Img 20230511 wa000228129

उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाचे आदेश काय?

निवडणुकांसाठी तयार राहा. निवडणुका कधीही होऊ शकतात.
मतदान यादीमध्ये ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा.ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे त्यांच्याशी संपर्क करुन अडचणी सोडवा.

Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये