कोथरूड, डहाणूकर कॉलनी मधील आकार मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

ढोल ताशांच्या गजरात हजारो गणेशभक्तांनी धरला ठेका
कोथरूड : डहाणूकर कॉलनी येथील आकार मित्र मंडळाच्या गणरायाचे सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. सात दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली. डहाणूकर कॉलनी ते कर्वे रस्ता या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात हजारो गणेशभक्त या मिरवणुकीत सामील झाले होते.
“गेल्या ३६वर्षांपासून अखंडपणे आकार मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना काळातील दोन वर्षे सोडता सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या १५ दिवसांपासूनच मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि स्वतः मी यासाठी झटत होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध नसताना आम्ही स्पीकर्स आणि साऊंड सिस्टीमसाठी आवाज मर्यादा पाळण्याचा प्रयत्न केला. कालच्या विसर्जन मिरवणुकीत देखील फटाके फोडायचे टाळून तसेच आवाज मर्यादा पाळून ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली. पोलिस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभल्याचे उत्सवप्रमुख सचिन फोलाने यांनी सांगितले.













