पुणे शहर

मातोश्री काय मशिद आहे काय ? राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला.

मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला राज ठाकरेंनी घेतला खरपूस समाचार

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला मातोश्री काय मशिद आहे काय ?असा सवाल करित राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेत मनसैनिकांना हनुमान चालिसा लावण्यास सांगितले. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा बोलण्याचं आव्हान दिलं. त्यावरुन मुंबईत मोठा गदारोळ झाला. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला चांगलेच सुनावले आहे.

राज ठाकरेंनी म्हटलं, राणा दाम्पत्य… मी सांगितलं काय होतं की, जर मशिदीबाहेर जोरात भोंगे वाजले तर त्याच्यासमोर हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचं बोलू लागले. मातोश्री काय मशिद आहे काय ? आणि मग ते इतकं प्रकरण झालं की, त्यांना अटक झाली. मग ते जेलमध्ये होते… मग ते मधू इथे चंद्र तिथे… या सर्व गोष्टींनंतर ते एकत्र आले त्यांना सोडून देण्यात आलं.

Img 20220519 wa0035

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये