कोथरुड

कोथरूडमध्ये बांधकाम साईटवरून पडून मजुराचा मृत्यू..

कोथरूड : कोथरूड मधील शिवतीर्थनगर मधील तिरुपती अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे.

शिवतीर्थनगरमध्ये तिरुपती अपार्टमेंटचा पुनर्विकास बांधकाम प्रकल्प सुरू आहे. या बांधकामावर काम करत असताना तीस फुटांवरून पार्किंग डक्टमध्ये पडल्याने रघुनाथ रामा आडे (वय ४४ वर्षे रा. सहयोगनगर वारजे माळवाडी पुणे)या मजुराचा मृत्यू झाला आहे. अवेर अर्बन रियालिटी असे बांधकाम करत असलेल्या कंपनीचे नाव आहे. ज्ञानेश्वर रघुनाथ आडे यांनी फिर्याद दिली असून या संदर्भात तपास व चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.आर अडागळे करत आहेत.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद चिकणे यांनी सांगितले की, सकाळी सूमारे १०.३० वा अचानक प्रचंड आरडाओरडा कानावर पडला. नेहमीप्रमाणे बघ्यांची गर्दी जमली होती. समोर पाहिले कामगार काम करत असताना अंदाजे ३० फूट उंचावरून पडल्याने पार्किंग डक्ट मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कामगारांच्या मदतीने रस्सीने त्याला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले. अंबूलन्स यायला वेळ होईल म्हणून वेळ न घालवता मी त्याला त्वरीत उचलून २ कामगार बरोबर घेउन स्थानिक नागरीकाच्या रिक्षात घालून पौड रस्त्यावरील सह्याद्री होस्पीटल मध्ये आणले. कामगाराला प्रचंड इजा झाली असल्याने रक्त प्रवाह ही खूप झाला होता. डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. दूर्दैवाने कामगार बंधूचा जीव वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये