महापालिका रुग्णालयातील रुग्णांसाठी तीन दिवसात एकही रेमडीसीव्हीर इंजेक्शन नाही ; भाजप व प्रशासनाचे अपयश : धुमाळ

पुणे : पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. मात्र वाढत्या रुग्ण संख्येच्या मानाने महानगरपालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप कडून आवश्यक ती उपाययोजना होताना दिसत नाही. केलेल्या उपाययोजना अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये व कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना गेल्या तीन दिवसांपासून एकही रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी तातडीने रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. No remedicivir injection in three days for patients in a municipal hospital; Failure of BJP and administration: Dhumal
बाधित रुग्णांना रेमडीसीव्हीर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात, जम्बो कोविड सेंटर शिवाजीनगर, सी.ओ ई.पी, दळवी हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटर बाणेर व इतर मनपाचे उभारण्यात आलेले छोटे मोठे कोविड सेंटर येथे सुमारे ९००० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सदर रुग्णांना एकही रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. ९००० रुग्णांमधील १२०० ते १५०० रुग्णांना रेमडीसिवेर इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता असून ते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परिस्थिती गंभीर होत आहे.
पुणे शहरात महापालिकेतील हाॅस्पिटल मध्ये गेले 3 दिवसात एकही रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांचे H.R.T.C लेव्हल १२ च्या पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच सत्ताधारी व प्रशासन रेमडीसिवेर इंजेक्शन मिळवण्या संबंधी कुठलीच हालचाल करताना दिसत नाही. सत्ताधारी भाजप नागरिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
या आधी पुणे महानगरपालिकेने अनेक वस्तू पाहिजे ती रक्कम देऊन ६७/३(क) खाली कुठल्याही परवानगी शिवाय खरेदी केल्या आहेत, तसेच रेमडीसीव्हीर इंजेक्शन सुद्धा मिळेल तिथे, मिळेल त्या कंपनीकडून ६७/३(क) खाली खरेदी करून तातडीने रुग्णांपर्यंत पोहचवण्यात येणे गरजेचे आहे पण तसा प्रयत्नच केला जात नाही. यासंदर्भात महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता सदर इंजेक्शन कुठेच उपलब्ध नाहीत. कंपनीकडून डायरेक्ट खरेदी करण्यास प्रशासन तयार आहे. एक ते दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध होतील अशी माहिती आयुक्तांनी दिली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.



