भाजपा कोथरुड मंडल कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

संघटन वाढीसह लोकसेवेचं केंद्र बनावे – चंद्रकांत पाटील
कोथरूड : भारतीय जनता पक्षाच्या कोथरुड मंडल कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. मंडल कार्यालय हे संघटन वाढीसह लोकसेवेचं केंद्र बनावे, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, दीपक पोटे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रत्येक कार्यालय हे जनसेवेचे केंद्र आहे. कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय हे जनसेवेचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि रिपाइंचे ॲड. मंदार जोशी यांच्या सह अनेक दिग्गज मान्यवरांनीही यावेळी कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.







