पुणे शहर

खडकवासलातून पाण्याचा पुन्हा विसर्ग वाढविला १८ हजार क्यूसेक्स पाणी मुठा नदी पात्रात सोडले.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे खडकवासला धरणातून आज सायंकाळी सात वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणाची पाणी पातळी 95 टक्के पेक्षा जास्त झाल्याने आज रात्री आठ वाजता धरणातून  10 हजार क्युसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत होते. रात्री दहा वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून १८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

खडकवासला धरणातून आज सायंकाळी ७:०० वा. सोडलेला ५११८ क्यूसेक्स विसर्ग रात्री ८ वाजलेपासून १००९६ क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.रात्री दहा वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून १८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

Img 20210707 wa0004

#PuneFloodAlert
#pmc

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये