राष्ट्रीय
पाच राज्यांची निवडणूक आज दुपारी जाहीर होणार निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
राज्यांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात यासाठी सर्व राजकीय पक्षांनी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने सर्व राज्यातील आढावा घेतला असून आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात येणार आहे.










