कोथरुड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सृष्टी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण..

कोथरुड : सृष्टी फाउंडेशनच्या वतीने डी पी रोड परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. कोरोनाच्या या संकट काळात सर्वांनाच ऑक्सीजनचे महत्व कळले आहे. त्या पार्श्वभूमीवर सृष्टी फाउंडेशनच्या वतीने आज पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
सृष्टी फाउंडेशन च्या वतीने गेली ६ वर्षे पर्यावरण दिनाच्या दिवशी वृक्षारोपण करण्यात येते असून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यात येत आहे. Tree planting on behalf of Srishti Foundation on the occasion of World Environment Day.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, अजय भुवड, विशाल भेलके, बाळासाहेब शेडगे, संतोष चव्हाण, नागेश चव्हाण, सचिन चव्हाण अंकुश मोहिते, अशोक माने, संतोष द चव्हाण, वृषभ मोकाटे वृक्ष अधिकारी अनिल साबळे आदी उपस्थित होते.



