अर्थजगत

सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून दीड कोटींची फसवणूक

नवी मुंबई : डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून तब्बल एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी बँकेचे संगणक विभाग प्रमुख निरंजन राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. एका हॅकरने डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर असलेल्या नवी मुंबई महापे येथील सर्व्हर कक्षात ऑनलाइन पद्धतीने संपर्क केला. त्याने बँकेचे खाते हॅक करून किंवा बँकेच्या विदेमध्ये (डेटा) मध्ये फेरफार करून बँकेची एक कोटी 51 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक विभाग प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी ही तक्रार अधिक तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये