कोथरुड

मारटकर खून प्रकरणात वेगाने तपास करण्याच्या सूचना- उदय सामंत

उदय सामंत यांनी मारटकर कुटुंबियांचे केले सांत्वन

पुणे : युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी तपास वेगाने करण्याच्या सूचना पुणे पोलीसांना देण्यात आल्या असून आरोपींना लवकरच शिक्षा होईल. असे आश्वासन देत महाराष्ट्र राज्याचे उच्च- तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना युवासेना पदाधिकारी दिपक विजय मारटकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

मारटकर खुन प्रकरणाची शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत सामंत यांना पुण्यामध्ये पाठवले आहे. त्यानुसार सामंत यांनी मारटकर कुटुंबियांची भेट घेत त्यानंतर पुणे पाेलिस आयुक्त व उपायुक्त, पाेलिस निरीक्षक, यांची बैठक घेऊन दिपक चा खुनींवर कठाेर कारवाई करण्याचा सुचना देण्यात  दिल्या आहेत. शिवसेना पदाधिकारी हत्येबाबतीत मी पुढील महिन्यामध्ये पुन्हा एकदा पुणे पोलिसांना भेटून काय कारवाई झाली ? याची माहिती घेणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, प्रशांत बधे, शहरप्रमुख संजय मोरे, संजय भोसले, विशाल धनावडे, किरण साळी, गजानन पंडित, गजानन थरकुडे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,  राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये