वारजे माळवाडी प्रभाग क्र. ३२ भाजपच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकारणी जाहीर

वारजे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडी च्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रभाग ३२ मधील नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी विविध आघाडीचे पदाधिकारी निवडण्यात आले.
यावेळी सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे भाजप चे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक व आमदार भिमराव तापकिर यांनी अभिनंदन करत मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुळीक यांनी पक्षाचे ध्येय धोरण, पक्षाचे महत्व तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय या बाबत मागदर्शन केले. तापकिर यांनी खडकवासला मतदार संघातील पक्षाची पुर्वीची परिस्थिती व आता बळकट संघटन, केलेली विविध विकासकामे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग ३२ चे अध्यक्ष रामदास मारणे यांनी केले होते. या प्रसंगी नगरसेवक सुशिल मेंगडे सरचिटणीस संदिप लोणकर, मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, वासुदेव भोसले, दत्तात्रय धुमाळ, सचिन दांगट, माधव देशपांडे, नाना काटे, ज्ञानेश्वर ठाकर, काका वाघमारे इत्यादी पदाधिकारी व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार रेडे यांनी केले तर आभार सचिन वांजळे यांनी मानले.






