रक्तदान शिबिरातुन शहीदांना श्रध्दांजली

स्व.उत्तमकाका भेलके प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
कोथरुड : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी आणि माजी नगरसेवक स्व.उत्तमकाका भेलके यांच्या स्मरणार्थ शिवसेनेचे कोथरुड विभाग प्रमुख उमेश भेलके यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १४१ जणांनी रक्तदान केले.
उमेश भेलके यांच्याकडून सलग ११ वर्ष या शिबीराचे २६/११ रोजी आयोजन करण्यात येत असते. यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेश मोकाटे, युवासेना विस्तारक राजेश पळसकर, साहेबराव भेलके, गजानन भेलके, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब खैरे, नागेश सुतार, विशाल भेलके, ॲड.मनोज नायक, आप्पा पोफळे, जगन्नाथ शिंदे, आनंद घैसास, वसंत वाघ, जयंत हतवळणे, मोहन भगत, पंडीत कदम उपस्थित होते.
पूना ब्लड बँक या रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. शिबिराचे संयोजन स्व.उत्तमकाका भेलके प्रतिष्ठान, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, एकदंत वाद्य पथक, समर्पण युथ फोरम यांच्या वतीने करण्यात आले होते.










