कोथरुड

कोथरूडमध्ये कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानची विधायक उपक्रम राबवत दहीहंडी साजरी

कोथरूड : कोथरूड मधील भेलकेवाडी आझादनगर येथील कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानने अनोख्या पध्दतीने विधायक उपक्रम राबवत दहीहंडी साजरी केली. दहीहंडी साठी सेलिब्रिटी आणणे, साऊंड सिस्टीम वरील खर्च टाळत प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील विविध घटकातील गरजूंना मदत करत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल भेलके व श्वेताली विशाल भेलके यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देण्यात आला, तसेच इनेब्लेर संस्थेतील अंध बंधू भगिनींना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे हवेली तालुक्यातील खडकवाडी येथील कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय विद्यालयातील होतकरू १५ विद्यार्थ्यांची फी भरण्यात आली व भोर तालुक्यातील हीरडोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील 50 मुला मुलींना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. दहीहंडी फोडल्यानंतर बालगोपाळांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले.

यावेळी एकदंत ढोल ताशा पथकाने सादर केलेल्या खेळाने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी उमेश भेलके, जयदीप पडवळ, अनिरुद्ध खांडेकर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विधायक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केल्याने कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये