मिठाई फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणेतर्फे भिलवडी येथील चितळे उद्योग समूह यांच्या बी जी चितळे डेअरी प्रकल्पाला भेट

पुणे : मिठाई फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणे तर्फे आज भिलवडी येथील चितळे उद्योग समूह यांच्या बी जी चितळे डेअरी प्रकल्पाला भेट देण्यात आली यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी, उपाध्यक्ष दिलीप बुधानी,योगेश अग्रवाल सचिव अमित अग्रवाल,सहसचिव मकरंद गाडवे, कोषाध्यक्ष दिनेश अग्रवाल, सह कोषाध्यक्ष कैलाश झंवर तसेच असोसिएशनचे जवळपास 70 सभासद उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत श्रीपाद चितळे, विश्वासराव चितळे,गिरीष चितळे व मकरंद चितळे यांनी केले. डेअरी प्रकल्प आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आला आहे प्रत्येक विभाग वेगळे असून संपूर्ण माहिती चितळे बंधू आणि तेथील व्यवस्थापक यांनी दिली दूध दही पनीर लोणी तूप श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या विभागाची पाहणी झाल्या नंतर त्यांच्या ब्रम्हा या बैल व रेड्या पासून सिमन निर्मिती केंद्र पाहण्यात आले अशिया खंडातील सर्वांत मोठा खासगी प्रकल्प आहे नंतर आग्रो प्रकल्प व गोठा ही पाहण्यात आला

या वेळी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चितळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपल्या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी च्या जोरावर आज स्पर्धेच्या युगात आपण व्यवसाय करत आहोत त्यामुळे इथून पुढे सुद्धा शासनाच्या सर्व नियमांना आधीन राहून आपला व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे आणि काही अडचणी आल्या तर असोसिएशन तर्फे आपणांस मार्गदर्शन करण्यात येइल. या प्रसंगी चितळे बंधूंचा सन्मान असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव अमित अग्रवाल यांनी केले.सदर प्रकल्प भेटीचे नियोजन उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी केले.









