कोथरूड मध्ये सफाई खात्यातील महिलांना ताणतनाव व्यवस्थापन व व्यसनाधिनता” विषयावर मार्गदर्शन

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयात, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने “महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन”
कोथरूड : pune Kothrud कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या समाज विकास विभागामार्फत “मुलगी वाचवा, मुलीला शिकवा,महिला सुरक्षा व सक्षमीकरण” या कार्यक्रमातंर्गत “महिलांचे ताणतनाव व्यवस्थापन व व्यसनाधिनता” या विषयावर सफाई खात्यात काम करणाऱ्या महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Guidance on “Stress Management and De-addiction” to Women in Cleaning Department in Kothrud
यावेळी व्याख्यात्या रश्मी पटवर्धन यांनी महिलांवरील ताणतनाव व्यवस्थापन व व्यसनाधिनता या विषयावर सखोल व अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता विभागात सफाईचे करणाऱ्या महिलांवर्ग आपल्या संसाररूपी रथ चालवत असताना अतिशय ताणतणावाच्या ओझ्याखाली कष्टमय जीवन जगत आहेत. तसेच पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपला संसार चालवताना घरातील मुलगा, मुलगी, सासू सासरे, व्यसनाच्या आहारी गेलेला नवरा, दिर, नंदा, जावा अशा प्रत्येक सदस्यांची काळजी घ्यावी लागते. घरातील सर्व कामधंदा पार पाडून सकाळी ६ वाजता सफाई कामासाठी हजर व्हावे लागते. अशा प्रकारच्या कष्टमय जीवन जगणाऱ्या महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात ताणतणाव येतात त्यामुळे त्यांना मिसरी लावणे, तंबाखू गुटखा खाणे, पांढरी माती व खडू खाणे, तर काही महिलांना दारूचे सुद्धा व्यसन लागलेले आहे हे दिसून येते. त्यामुळे त्यांना कॅन्सर, पोटाचे विकार, शरिरातील रक्त व पाणि कमी होणे, मासिकपाळी नियमित न येणे, चक्कर, अशक्तपणा जाणवणे या प्रकारच्या व्याधींचा महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

पटवर्धन म्हणल्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोणत्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नये. व्यसनाधीनतेमुळे आपल्या मनावरील ताणतणाव वाढतो त्याचेच अनुकरण आपली मुलंमुली करत असतात हे लक्षात ठेवून सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक ताण कमी करण्यासाठी आपल्या मुलगी व मुलगा भेदभाव न करता मुलींना शिक्षण देऊन सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभी करा. तसेच व्यसन करत असताना ” चाहत, आदत आणि जरूरत” अशा कोणत्याच पद्धतीचा महिलांनी आवलंब करू नये असा सल्ला ही त्यांनी दिला.



कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती हॉल मध्ये ही कार्यशाळा पार पडली. उपआयुक्त संदीप कदम, विभागीय कार्यालय क्रं. २ चे उपआयुक्त संतोष वारुळे तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, कोथरूड विभागाचे समाज सेवक पांडूरंग महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली समाज विकास विभागाचे मुख्य समन्वयक विजय पाटोळे, मुख्य समुपदेशक विद्या गुंडाळ, महिला आरोग्य निरिक्षक रूपाली शेडगे यांनी महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यास परिश्रम घेतले.
कार्यशाळेत महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी प्रमुख व्यख्यात्या संयोजक व आयोजक यांचा सत्कार केला. कार्यशाळेचे सुत्रसंचलन करत असताना समुपदेशक विद्या गुंडाळ यांनी समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व स्त्री संशोधन केंद्राच्या कार्याची माहिती सविस्तर दिली.
सदर कार्यक्रमात आरोग्य निरिक्षक गणेश साठे, सचिन लोहकरे, करण कुंभार, गणेश चोंधे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रमोद चव्हाण मोकादम अशोक कांबळे, गणेश चव्हाण सेवक कुणाल कांबळे, निशांत सकट व ९७ महिला सफाई सेविका सहभागी झाल्या. सदर कार्यक्रमाचा समारोप मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी केला.






