महाराष्ट्र

पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार

मुंबई : जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांचे घराचे
स्वप्न साकार होणार आहे. या रहिवाशांना आता झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार आहे. जानू भोये नगरमधील रहिवाशांनी घरासाठी तब्बल १२ वर्षे लढा दिला. मालाड हायवे, मंत्रालय येथे धरणे आंदोलन केले अखेर रहिवाशांच्या लढ्याला यश मिळालं. आज दिनांक ११ जून २०२३ रोजी रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. जानू भोये नगरमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना घर देण्यासाठी मा. नगरसेवक आणि भाजप नेते विनोद मिश्रा यांनी अथक प्रयत्न केले.

Img 20230610 wa00452049733278487094475

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना घर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण काही कारणामुळे सरकार बदललं आणि नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तसेच गृहनिर्माण खाते फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी पुन्हा या विषयवार माहिती घेतली आणि म्हाडाच्या मुख्य कार्यालयात दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी बैठक आयोजित केली. या बैठकीत सविस्तर चर्चा आणि सादरीकरण देखील झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी क्षेत्रात असणाऱ्या जुन्या चाळीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंबाबत सहानभूतीपूर्वक तसेच सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.

Fb img 16837376233493064729888638918603

या बैठकीनंतर हा प्रस्ताव मंत्रालयातच पडून होता. त्यासंदर्भात माहिती घेवून मा. नगरसेवक आणि भाजप नेते विनोद मिश्रा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शनिवारी दिनांक १० जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मा. नगरसेवक आणि भाजप नेते विनोद मिश्रा यांची भेट झाली आणि याविषयावर चर्चा केली. तसेच यासंदर्भात सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
आज दिनांक ११ जून २०२३ रोजी जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार असल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे कळविण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या त्वरीत निर्णयामुळे जानू भोये नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे याचा आनंद तर आहेच, त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा मुंबईमधील अनेक झोपडीधारकांना भविष्यात नक्कीच होणार आहे. राज्य सरकारने निर्णय घेताना दाखवलेली तत्परता उल्लेखनीय आहे याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे मा. नगरसेवक विनोद मिश्रा यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मिहीर कोटेचाजी यांनी मोलाची मदत केली याबद्दल त्यांचे ही आभार मानतो, असे मा. नगरसेवक विनोद मिश्रा म्हणाले.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये