पुणे शहर
शहराचे आरोग्य राखणाऱ्या कचरावेचकांच्या ढकलगाड्यांची स्वच्छता करून पुण्यात साजरी झाली दसऱ्याची पूर्वसंध्या

पुणे : पुणे शहराचा कचरा दारोदारी जात आपल्या ढकलगाड्यांमध्ये गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांनी त्याच ढकलगाड्यांची स्वच्छता आणि सजावट नागरिकांच्या साथीने करून १४ ऑक्टोबर , २०२१ रोजी दसऱ्याची पूर्वसंध्या अनोख्या पद्धतीने साजरी केली.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. दरवर्षी पुणे महानगरपालिकेची ११३ कोटी रूपयांची बचत करणाऱ्या स्वच्छ कचरावेचकांच्या कामात ढकलगाडी हे महत्वाचे साधन आहे. त्याची स्वच्छता करण्यासाठी नागरिकांनी घेतलेला सहभाग हा नागरिक व कचरा वेचक यांच्यातील विश्वासाचे व बांधिलकीचे नाते अधोरेखित करणारा आहे.




