पुणे शहर

प्रसंगावधान दाखवत पीएमपीएमएलच्या बसचालकाने बस थेट रुग्णालयात नेली आणि वाचला बाळाचा जीव…

बसचालक आणि वाहकाच्या तत्पुरतेचे सर्व स्तरातून कौतुक

पुणे : शुक्रवारी सकाळी कोथरूड डेपो ते कात्रज मार्गावरील पीएमपीएमएलच्या बस क्रमांक १०३/४ (TT.42) मध्ये एक असा प्रसंग घडला, ज्याने माणुसकी आणि कर्तव्याचे नवे रूप समोर आणले. लकडी पुलाजवळ अलका टॉकीज चौकात अचानक बस मधील एका लहान बाळाची तब्येत बिघडली. बाळाच्या डोळ्यांत पांढरेपणा दिसू लागला, तोंडातून फेस येऊ लागला. ही गंभीर परिस्थिती पाहताच बसमधील वाहक तेजस थोरात (६०८१) आणि चालक मिलिंद गायकवाड (K६१८) यांनी विलक्षण तत्परता दाखवली.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बस थांबवली आणि मार्ग बदलून तातडीने बाळाला जवळच्या थेट पूना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.

त्यांच्या या त्वरित निर्णयामुळे बाळावर वेळीच उपचार होऊ शकले. विशेष म्हणजे, बसमधील सर्व प्रवाशांनीही या संकटाच्या क्षणी संपूर्ण सहकार्य केले, ज्यामुळे ही मदतकार्य यशस्वी झाले.या उल्लेखनीय कार्याची माहिती प्रवासी सचिन चौधरी यांनी पीएमपीएमएलच्या तक्रार निवारण ॲपद्वारे कळवली. त्यांच्या या माहितीची त्वरित दखल घेत कोथरूड डेपोचे मॅनेजर सुरेंद्र दांगट यांनी वाहक आणि चालक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.

Img 20250508 wa0001235733770892078245

वाहक तेजस थोरात हे एरंडवणे येथील गणेशनगर मंडळाचे देखील कार्यकर्ते आहेत. त्यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेचे परिसरातील नागरिक मोठे कौतुक करत आहेत. हा सन्मान केवळ दोन कर्मचाऱ्यांचा नव्हता, तर पीएमपीएमएलच्या माणुसकीने भरलेल्या सेवेचा होता.सेवा आणि संवेदना यांचा संगमच खऱ्या अर्थाने समाजाला जोडतो. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये