पुणे शहर

चांदणी चौक जैन मंदिर मध्ये दशलक्षण महापर्व उत्साहात..

विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, पारणे चे आयोजन

कोथरुड :  चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये, दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व गुरूवार दिनांक २८/८/२०२५ रोजी सुरू होऊन, रविवार दिनांक ७/९/२०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणीच्या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती पालखी मिरवणुक सोहळ्याने झाली.

या दशलक्षणधर्म पर्वात दिगंबर जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारून त्याचप्रमाणे मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या दशलक्षण धर्मपर्व च्या पवित्र पर्वामध्ये विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दररोज जैन मंदिरामध्ये सकाळी महाभिषेक, महाशांतीधारा, दशलक्षण पर्व पूजन, पूजा-आर्चा व सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर संगानेर(राजस्थान) येथील अतिषयजी शास्त्री जैन यांचे दररोज दशधर्मावर प्रवचन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नित्यनियमाने दहा दिवस आयोजन करण्यात आले होते.

Img 20250508 wa00014407724251968801054

या दशलक्षण धर्मपर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच,  सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य या दशलक्षणांची पूजा करण्यात आली. दिगंबर जैन समाजात या दशलक्षण धर्म पर्व ला अत्यंत महत्त्व असून या धर्मपर्व  काळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.  रविवार दिनांक ३१/८/२५ रोजी जैन पाठशाळेतील मुलांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा त्या निमित्ताने गौरव करण्यात आला.

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी क्षमावानी निमित्ताने दशलक्षण विसर्जन समाप्ती भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने झाली. यावेळी चांदीच्या पालखी मध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. यावेळी १० दिवस निरंकार उपवास केलेले ज्योती अभिजित शहा व वासंती महावीर देशमाने यांची जैन धर्म प्रभावानेसाठी बग्गी रथातून चांदणी चौक ते बावधन मेन रोड वर मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळा व मिरवणुकीसाठी गोमटेश झांज पथक, वसगडे,  ता.पलूस, जिल्हा सांगली यांनी केलेल्या सुरेख वादनाने सर्वांची मने जिंकली. या वादनाच्या तालात जैन युवक युवतींनी गरबा चे नृत्य करीत आनंद लुटला.

Img 20250906 wa0042281292667080974856625006

पालखी ग्राम परिक्रमा करून दि.जैन मंदिरात आल्या नंतर भगवान महावीर महाशांतिधारेचा चा मान विशाल दगडे परिवार यांना, तर भगवान चंद्रप्रभूजी महाशांती धारेचा मान सुरज मगदूम परिवार यांना, तर मुनीसुव्रतजी महाशांती धारेचा मान गायत्री मालगावे यांना मिळाला. त्यानंतर दहा दिवस निरंकार उपवास केलेल्या व्रतींचा पारणेचा कार्यक्रम मंदिरच्या स्वाध्याय हॉल मध्ये संपन्न झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर जैन समाजासाठी वात्सल्य सुरुची भोजन आयोजित करण्यात आले होते. वरील सर्व कार्यक्रम मध्ये दिगंबर जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त उदय लेंगडे, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदूम, श्रीकांत पाटील, रमेशभाई शहा, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, मोहन कुडचे,  प्रीतम मेहता, अमित गांधी, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, डॉ.अभिजित शहा, प्रशांत पाटील, केतन खापरे, प्रीती पाटील, प्रशांत गोधा, चेतन जैन आदी विश्वस्त कमिटी उपस्थित होते.

Fb img 17575688025518630244243602003405

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये