महाराष्ट्र

काँग्रेसमध्ये धुसफूस : आशिष देशमुख काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार

पुणे : राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्राबाहेरील उमेदवार दिल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीतूनच माजी आमदार व काँग्रेस नेते आशिष देशमुख हे काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार आहेत. उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावनाही देशमुख यांनी व्यक्त केली.

माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचा मुद्दा उपस्थित करत पी. चिदंबरम यांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केलाय. डॉ. देशमुख यांनी पक्षश्रेष्टींच्या उमेदवार निवडीच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रतापगडी ऐवजी महाराष्ट्रातून काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना उमेदवारी द्यायला हवी होती. कारण त्यांचा नागपूर आणि विदर्भाशी संबंध असून येथील नेत्यांशी त्यांची जवळीक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरातील ठरावाचे काय झाले असा सवाल उपस्थित केला.

आशिष देशमुख म्हणाले, “या शिबिरात ‘एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी देण्याचा ठराव झाला होता, परंतु पी. चिदंबरम यांचा मुलगा खासदार असताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना उमेदवारी देण्यात आली, मग या ठरावाचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये