शैक्षणिक

PUNE : बिबवेवाडीतील इंग्रजी शाळेमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण

पुणे : बिबवेवाडीत क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याचेही सांगण्यात येत आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

फी भरण्याच्या वादावरून मुख्याध्यापकांनीच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली.

पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने ही घटना नेमकी किती गंभीर आहे हे कळत आहे. सर्वांना धक्का देणाऱ्या या घटनेप्रकरणी मयुरेश गायकवाड यांनी तक्रार केली असून, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पालक फक्त निवेदन करण्यासाठी शाळेत आले होते. कोरोना संकटांमुळे त्रस्त पालकांनी फीसंदर्भात शाळेनं दिलासा देण्यासाठीचं निवेदन करण्यासाठी शाळेची वाट धरली. 

पण, पालकांचं काहीही न ऐकून घेता मुख्याध्यापकांनी थेट बाऊंसर अंगावर सोडले अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. मुळात शाळेसाठी बाऊंसर ही संकल्पनाच पूर्णपणे चुकीची असल्याचा सूरही काही पालकांनी आळवला. 

हा काही पब आहे का, लहान मुलांच्या एका संस्थेमध्ये बाऊंसर कोण ठेवतं असा संतप्त सवाल काहींनी केला. कायद्याच्या मार्गानं फी बाबत दिलासा देण्यासाठी पालक आर्जव करताना शालेय प्रशासनाची अशी वागणूक आक्षेपार्ह असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये