महाराष्ट्र

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूसंपादनासाठी निधी वितरणाचे आदेश : विजय डाकले

पुणे : पुण्यात संगमवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या  आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाच्या भूसंपादनासाठी राज्यशासनाने ८७ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीची भरघोस तरतुद केली आहे. हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाला सभागृहामध्ये चर्चा होऊन मान्यता मिळाली होती. त्याबाबतची सर्व प्रक्रिया पुर्ण होऊन काल वित्त विभागाने मान्यता दिली व निधी वितरणाचे आदेश निघाले असल्याची माहिती. आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाकले यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष आग्रही भूमिकेमुळे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे गठन एप्रिल २०२१ मध्ये करण्यात आले आणि त्यांनी याप्रश्नी सातत्याने बैठका घेऊन निधीही मिळवून दिला. आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकासाठी शासनाने मंजूर केलेल्या ८७ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीसाठी मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक सुभाष जगताप, अविनाश बागवे, समाज म्हणुन तत्कालिन समितीचे अध्यक्ष अशोकराव लोखंडे व सदस्य यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

शासनाच्या या निर्णयाबद्दल विजय डाकले व समिती सदस्यांचा महाविकास आघाडीच्या तिनही पक्षाचे अध्यक्ष  रमेश बागवे, प्रशांत  जगताप, गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यभरातील मातंग समाजातून सातत्याने लहुजींच्या स्मारकाची मागणी गेली कित्येक वर्ष होत होती, समितीची स्थापना झाल्यापासून समितीचे अध्यक्ष विजय (बापू) डाकले व समितीच्या सर्व सदस्यांनी शासन दरबारी आपली मागणी लावून धरली, त्याकरता सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले. हे स्मारक आंतरराष्ट्रीय किर्तीचे बनविण्याचा मानस पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

या स्मारकात लहुजींचा जीवनपट उलगडणारी भव्य शिल्पसृष्टी, भव्य पुतळा, भव्य ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षा केंद्र, शासकीय योजना राबविण्यासाठी मदत केंद्र, शारिरीक व धाडसी खेळ प्रशिक्षण केंद्र त्याचबरोबर मातंग समाजासोबतच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी निवासी वस्तीगृह आदी विचाराधीन असून समाजाच्या विविध सुचनांचा विचार करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच आराखडा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

मागील भाजप सरकारने लहुजींच्या स्मारक उभारणीच्या नुसत्याच पोकळ घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात काहीच कृती केली नाही. अशी टीका भाजपवर महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आली. शिवसेना,

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँगेस चे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,  गजानन थरकुडे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, शांतिलाल मिसाळ, रवी पाटोळे, राम कसबे, राजू अडागळे तसेच समाजाचे नेते अनिल हातागळे , अजित इंगळे यांच्यासह महाविकास आघाडीमधील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये