कोथरूडकरांना उद्या अनुभवता येणार भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा ; कोथरूड व्यासपीठातर्फे आयोजन

आयोजक शाम देशपांडे यांची माहिती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्धापनदिनानिमित्त कोथरूड व्यासपीठाने सोमवारी (ता. ५) सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील पौड रस्त्यावरील पेठकर साम्राज्य समोर सूर्यकांत काकडे फार्म येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी भव्य सेट उभा करण्यात येत असून कोथरूड करांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा दृश्य स्वरूपात अनुभवता येणार आहे.
कोथरूड व्यासपीठाचे अध्यक्ष शाम देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील हा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. यात तब्बल १५० कलाकारांचा सहभाग असणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहूणे असतील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. यावेळी जगन्नाथ कुलकर्णी, रूपेश कुंबरे उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, 350 व्या राज्याभिषेक दिना निमित्त पद्म विभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा भव्य दिव्य कार्यक्रम कोथरूड भागामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून उद्या (सोमवारी) सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे.










