पुणे शहर

मनात डॉक्टर होण्याची इच्छा पण समोर घरचे आर्थिक संकट ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली शिक्षणाची जबाबदारी..

पुणे : Pune city घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना मनात डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात बाळगून शिक्षण घेत असलेल्या सुष्टी कुलकर्णी हिने दहावीत उत्तीर्ण होत महानगरपालिकेच्या 35 शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला. तिने 98.6% गुण मिळवले. पण पुढे शिक्षण घेण्यास घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र सृष्टीची ही अडचण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुढे येत सोडवली आहे.

सृष्टीच्या या कठीण परिस्थितीत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे हा तिच्यासाठी धावून आला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी  यांनी सृष्टीचा 11-12 वी चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. नांदेड शहर शाखेतील अनेक दानशूर सभासद मदतीसाठी धावून आले पुढे आले आहेत. मकरंद गोगटे यांनी विलंब न लावता पहिल्या टप्प्यातील शिक्षणाचा खर्चाचा धनादेश आज सृष्टीच्या नावाने तिच्या हातात देण्यात आला. सृष्टीच्या मेडिकल admission पर्यंतची जबाबदारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे. 

आपल्या या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेल्या  मदतीमुळे नितीन व नेहा कुलकर्णी हे पालक भारावून गेले व त्यांनी महासंघाचे आभार मानले आहेत. महासंघाने याआधी अनेक गरीब मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. ज्यायोगे त्यांचे शिक्षण अविरत पणे चालू आहे.

या शैक्षणिक उपक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष कमलेश जोशी, सरचिटणीस राहुल जोशी, मकरंद गोगटे, गिरीश कुलकर्णी, आनंद कावसानकर, समृद्धी गोगटे, मंदार रेडे उपास्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये