वारजेत वृद्धाश्रमात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ज्येष्ठांची दिवाळी झाली सुरेल..
वारजे : वारजे येथील शांतीबन वृद्धश्रमात दिवाळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत येथील ज्येष्ठांची दिवाळी सुरेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वृद्धश्रमात राहत असलेल्या ज्येष्ठांच्या जीवनात रंग भरण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत वारजे येथील शांतीबन वृद्धश्रमात राष्ट्रवादीचे चित्रपट,साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या वतीने गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या गीतांच्या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची दिवाळी वेगळ्या प्रकारेच साजरी केली गेली.
यावेळी माजी नगरसेवक किरण बारटक्के, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी स्विकृत नगरसेवक सचिन दांगट उपस्थित होते. या तिघांनी गाणे गात सर्व वृद्धांचे मनोरंजन केले. सशस्त्र सेना चिकित्स महाविद्यालयाचे जनरल नरेंद्र कोतवाल, ब्रिगेडियर भट्टी, कर्नल चेतना व या महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनीही आजी-आजोबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिवाळीचा खाऊ वाटप करून एक वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी केली.. संस्थापिका अनिता देवकर यावेळी उपस्थित होत्या.
उपस्थित सर्वांनी वेळ काढून आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी अशोक उनकुले,श्रद्धा कंगळे, दाते मॅडम.राजेंद्र जैन, यंदे सर, डोंगरे सर हे गायक कलाकार उपस्थित होते.