पुणे शहर

सोसायटी अंतर्गत लसीकरण केंद्राचा पुण्यातील पहिला यशस्वी प्रयोग…

पुणे : माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने, कोथरूड येथील वूड लॅन्ड सोसायटी येथे सोसायटी अंतर्गत लसीकरण केंद्राचा यशस्वी प्रयोग झाला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सी. बी. कुलकर्णी काकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून 45 वर्षाच्या पुढील वयोगटातील व्यक्तीचा दुसरा डोस, त्याच बरोबर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीचा पहिला डोस देण्यात आला. सहारा हॉस्पिटल च्या डॉ. जगताप, डॉ . पाटील यांनी त्यांच्या टीम ने यासाठी सहकार्य केले.(The first successful experiment of the vaccination center under the society in Pune )

” सोसायटी अंतर्गत लसीकरण केंद्राची मागणी मी सुरवातीपासूनच महानगरपालिका आणि शासनस्तरावर करत होते. परंतू त्याची अंमलबजावणी न झाल्याने आम्ही खाजगी प्रयत्नातून ही अंमलबजावणी आम्ही केली. नागरिकांना याचा लाभ होणार आहे याचा मला आनंद आहे.”, असे प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर ज्या सोसायट्यांना केंद सुरू करायचे आहे त्यांनी संपर्क साधावा (9422037306) असे आवाहन केले आहे.

Img 20210522 wa0203

वूडलॅन्ड सोसायटी चे संजय जगावकर, प्रदीप म्हेत्रे ,  अजित वेलिंग,  राजीव प्रधान, निशिकांत भावे,  अजय बेलसरे, अनामिका बोरकर  तसेच नगरसेवक जयंत भावे, शहर चिटणीस अनिता तलाठी, जान्हवी जोशी, अपर्णा लोणारे हे मान्यवर उपस्थित होते.

Img 20210619 wa0147

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये