नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल म्हणजे पुणेकरांना शिक्षा; तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा

पुणे : कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील वाहतूकीबाबत या क्षेत्रातील तज्ञ, तंत्रज्ञ,नागरिक,सामाजिक संस्था यांना विश्वासात घेऊनच नवीन नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. कर्वे रोड वरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्वरीत उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शाम देशपांडे, प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
कर्वे रोड हा पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा, मोठया प्रमाणात वाहतूक असलेला व अनेक उपनगरांना जोडणारा महत्वाचा रस्ता या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक असल्याने कायम वाहतूकीचे अनेक प्रश्न वारंवार निर्माण होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करून, नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असताना चुकीच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना मनस्ताप कसा होतो. याचे सध्याचे उदाहरण
म्हणजे कर्वे रोड वरील नळस्टॉप चौकात नवीन बांधलेला उड्डाणपुल आहे.
हा उड्डाणपुल म्हणजे पुण्याच्या पश्चिमेकडील नागरिकांना दिलेली शिक्षा आहे असे आम्हाला वाटते. कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. परिसराचा अभ्यास नाही, तज्ञांची चर्चा नाही, व्यापारी, रहिवासी, दुकानदार यांना कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा पूल बांधला त्याचे परिणाम नागरिक भोगत आहेत. सध्या वाहतूकीचा संपूर्ण ताण हा आजूबाजूच्या छोटया-मोठया रस्त्यावर, गल्ल्यावर आलेला आहे. मोठया प्रमाणात पार्किंगची समस्या भेडसावत आहे.
हा पूल बांधताना पार्किंगचा विचार केला नाही, छोटया-मोठया व्यावसायिकांचा, दुकानदारांचा विचार केला नाही. अनेकांचे व्यवसाय हे पूर्णपणे बंद झाले आहेत. अनेकाना कुटुंबाचा चारितार्थ चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा अत्यंत चुकीचा व रस्त्यावरील वाहतूकीबाबत या क्षेत्रातील तज्ञ, तंत्रज्ञ,नागरिक,
सामाजिक संस्था यांना विश्वासात घेऊनच नवीन नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. आपण कर्वे रोड वरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्वरीत उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.




